Top News महाराष्ट्र मुंबई

“माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत…”; रामदास आठवले यांनी घेतली नवी शपथ!

मुंबई | माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव जिवंत ठेवणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाला डाग लागू देणार नाही. अशी शपथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी घेतली.

जोगेश्वरी पूर्व येथील सारिपुत्त नगर येथे रिपाइंचे युवा जिल्हा अध्यक्ष दिवंगत भरत पाईकराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वार कमानीचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

आठवले म्हणाले की, “राज्यातील नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करताना केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांचीच सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची,कपात करण्याची राज्य सरकारची भूमिका दुजाभाव करणारी आणि अन्यायकारक आहे. माझी सुरक्षा कमी केली तरी माझ्या कामात काही फरक पडणार नाही आणि माझे काम कुठेही थांबणार नाही.”

तसंच, मुंबई रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीने झोपड्यांना अभय देण्याचे काम आम्ही केले. झोपड्यांच्या जागी आता एसआरए मुळे इमारती उभ्या राहिल्या आहेत. एसआरए योजनेत 550 फूट बिल्ट अप एरिया चे घर द्यावे ही रिपाइं ची मागणी असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“बर्ड फ्लूमुळं व्यावसायिकांचं नुकसान, कोंबड्यांच्या आयात निर्यातीवर बंदी घालू नका”

कोरोना लसीकरणाची मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार!

साताऱ्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘या’ अभिनेत्रीचा रोड शो

‘…तर मोदी आज आहेत त्यापेक्षा मोठे होतील’; शिवसेनेचा मोदींना सल्ला

मोदी सरकारने दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या