Top News कोरोना महाराष्ट्र मुंबई

जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे

Photo Courtesy- Facebook/Nilesh Rane-Uddhav Thackeray

मुंबई | गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित करताना दैनंदिन व्यवहारांवर काही निर्बंध आणण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान राज्यातील राजकारणाला जोर आला असून. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही कोरोनावरुन राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ट्विट केलं आहे.

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, जगामध्ये उद्धव ठाकरेंसारखा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत ते मुख्खमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीत. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महारष्ट्रात पसरतो कारण मुख्खमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

अजून एका ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, राज्यात 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. मात्र, अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? लाॅकडाऊनच्या संकटात लोकांच्या नोक्ऱ्या, बॅंकेचे हफ्ते, लाईटबील घेऊनसुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लाॅकडाऊन होतोय.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्खा झपाट्याने वाढली आहे. काल राज्यात कोरोनाचे 6 हजार 971 नवे रुग्ण सापडले आहेत. तर कोरोनामुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात केवळ 2 हजार 147 रुगण बरे झाल्याने कोरोनाच्या अॅक्टिव रुग्णांमध्ये 4519 रुग्णांची भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या –

बॅंकेत कर्मचारी सांगून केलं लग्न पण डोळ्याअंधारी करायचा ‘हे’ उद्योग

आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल त्यावेळी…- मोहन भागवत

राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती; म्हणाले…

‘भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल’; इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर

कॅनरा बॅंकेचं स्तुत्य पाऊल, हाऊसिंग तसेच एज्युकेशनल लोनला गती देण्यासाठी उपक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या