बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेवढा गुन्हा त्या नराधमांचा आहे, तेवढंच पाप आघाडी सरकारचं आहे”

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर शरसंधान साधलं आहे. यावेळी त्यांनी चाळीसगाव येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देऊन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एका अल्पवयीन तरूणीवर चाळीसगाव येथे सामुहीक अत्याचार घडल्याची माहिती शेअर करून घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला या घटनेवरून खोचक शब्दात सुनावलं आहे.

त्यांनी ट्विटमध्ये सुनावलं आहे, चाळीसगावातील घटना दुर्दैवी आहे. राज्यात वसूली करणारे, भूखंड गिळणारे, हत्या करणारे, बलात्कार करणारे, बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या गुन्हेगारांना संरक्षण मिळत आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. पुढे त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत, फक्त शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांना संरक्षण मिळत नाही, अशी गंभीर टीका देखील त्यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी “जेवढा गुन्हा त्या नराधमांनी केला आहे, तेवढंच पाप महाविकास आघाडी सरकारचं देखील आहे,” अशी खळबळजनक टीका त्यांनी केली आहे. दरम्यान चाळीसगाव येथे एका 16 वर्षीय तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर चाळीसगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

ही पीडिता अल्पवयीन असून शाळेत शिकत आहे. तिला आरोपींनी पैशाचे आमिष दाखवून मोटारसायकलवरून एका अज्ञातस्थळी नेलं व तेथे एका पडक्या घरात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरूणीने घरी जाऊन सर्व प्रकार आईला सांगितला. या प्रकरणी तरुणीच्या आईने नातेवाईकांसोबत पोलिस स्टेशनमध्ये जाऊन दोघांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“तेव्हा भाजप सत्तेत असती तर काश्मीर, जूनागढ, हैद्राबाद संस्थानांना पाकिस्तानला जा असं…”

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

साताऱ्यात राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

भाविकांची प्रतिक्षा संपली; सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे अखेर उघडले

मनसेला मोठा धक्का, पुण्यातील हा दिग्गज नेता पक्ष सोडण्याची शक्यता

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More