बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की मोदींची दाढी एक इंच वाढते”

भोपाळ | देशात वर्षभरापासून महागाई गगनाला भिडताना दिसत आहे. त्यामुळे देशातील जनता त्रस्त आहे. तसेच विरोधक महागाईवरून सातत्याने मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहेत.

जे दिल्लीत दाढी वाढवून बसले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की त्यांची दाढी एक इंच वाढते. महागाई एवढी वाढली आहे की, त्याचा परिणाम आता जनतेच्या ताटात दिसून येत आहे. लोकांच्या ताटातील पदार्थ कमी कमी होत आहेत, अशी टीका कमलनाथ यांनी मोदींवर केली आहे.

‘शिवराजजींबद्दल मला पहिल्यापासूनच म्हणत आलोय की, एक चांगले अभिनेते आहेत. चांगले कलाकार आहेत. तसेच त्यांना कलेची जाण चांगली आहे. ते सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलत जनतेची दिशाभूल करत आहेत’, अशी टीका कमलनाथ यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यावर केली आहे.

दरम्यान, देशात मागील काही दिवसांपासून दैनंदिन जीवनातील सर्वच वस्तुंचे भाव वाढलेले दिसत आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरचे दर प्रचंड वाढले आहेत.

थोडक्यात बातम्या –

अखेर पाकड्यांनी राग काढलाच! न्यूझीलंडच्या किवी खेळाडूंना डिवचलं; पाहा व्हिडीओ

ऐन दिवाळीत महागाईचा भडका! सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता

रडण्यानेही वजन कमी होतंय, कसं ते वाचा सविस्तर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More