बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल महागलं म्हणून ‘या’ पठ्ठ्यानं चक्क खरेदी केला घोडा

यवतमाळ | कोरोनानं जवळपास गेल्या दोन वर्षापासून थैमान घातलं आहे. या काळात सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही या किंमती वाढतच चालल्या आहेत. मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ झालेली पाहायला मिळतं आहे. या वाढत्या किंमतींना कंटाळून एका पठ्ठ्यांनं चक्क घोडाच खरेदी केला आहे.

पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता यवतमाळ जिल्ह्यातील तेंडोळी येथील दत्ता थावरा राठोड नावाच्या व्यक्तीनं चक्क घोडाच खरेदी केला. सततच्या वाढत्या इंधन दरवाढीला कंटाळून त्यांनी हा घोडा खरेदी केला आहे. त्यामुळे आता कितीही दरवाढ झाली तरी त्याच्या डोक्याला टेंशन राहणार नाही.

दत्ता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही घोडा घ्या किंवा सायकलनं प्रवास करा असं सांगत आहेत. कारण सामान्यांना परवडणार नाही अशा किंमती वाढत चालल्या आहेत. दुचाकी चाकीला दूर करत या व्यक्तीनं पंधरा हजार पाचशे रुपयाचा घोडाच विकत घेतला आणि त्या घोड्यानं ते रोज पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करतात.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलं होतं. परंतू लॉकडाऊन उठवल्यानंतर बऱ्याच वस्तूंच्या किंमतीही वाढल्या असल्याचं पाहायला मिळलं होतं. यातच पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढललेले पहायला मिळाले.

थोडक्यात बातम्या – 

‘एनसीबीच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र’, नवाब मलिकांच्या ट्विटनं पुन्हा खळबळ

11 महिने पूर्ण झाले तरी शेतकरी आंदोलन मात्र सुरूच; पण आता पुढे काय?

देशातुन कोरोना लवकरच हद्दपार होणार?, 8 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More