बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सोमय्यांना दिल्लीत मुजरा करायला देत नाहीत म्हणून गल्लीत गोंधळ घालतात”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या हे मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसत आहेत. किरीट सोमय्यांच्या मुलूंड येथील घराबाहेर पोलिसांनी गर्दी केली होती. मला कोल्हापूरला न जाऊ देण्यासाठी आणि मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला घरातून अटक करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले आहेत, असा आरोप किरीट सोमय्यांनी राज्य सरकारवर केला होता. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांच्यावर काँग्रेसने टीका केली आहे.

राज्यात या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या वादात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. सोमय्यांना दिल्लीतील भाजप नेते मुजरा करायला देत नाही. म्हणून लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाअधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी सोमय्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

तसेच, फडणवीस सरकारच्या काळात फक्त कडकनाथ कोंबड्या दाखवल्या म्हणून तडीपार करणारे, सभेत काळे कपडे घालण्यास मनाई करणारे आणि आंदोलनाआधीच स्थानबद्ध करणारे भाजपा नेते सोमय्यांना नोटीस दिली म्हणून गळे काढत आहेत. बाबांनो सोमय्या कोणाच्याही मालमत्ता बेनामी दाखवतात म्हणून जनतेत भीती आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दुसऱ्याच्या मालमत्ता तिसऱ्याची मालमत्ता म्हणूून सांगितल्यावर लोक बोंब मारणार की नाही? सोमय्यांच्या नौटंकीत कायदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून जिल्हाबंदी आहे. सोमय्या तक्रारी करत आहेत ना! नाहीतरी राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या आहेत मग त्यांचे काम भाजपचं करणार का? असा सवाल देखील सचिन सावंत यांनी भाजपला विचारला आहे.

वाचा ट्विट – 

थोडक्यात बातम्या –

‘…अन्यथा किरीट सोमय्यांना जन्माची अद्दल घडेल’; हसन मुश्रीफांचा पलटवार

‘किरीट सोमय्या आंतकवादी आहेत का?’; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मोठी बातमी! कायरन पोलार्ड करणार मुंबईचं नेतृत्व; रोहित, हार्दिक संघाबाहेर

इवेन्ट ख़त्म! 17 सप्टेंबरच्या लसीकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More