बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरे दिसताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा, पाहा व्हिडीओ

मुंबई | भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे सरकार (Uddhav Tahackeray) यांच्याविरोधात एक ट्विट केलं होतं. हे ट्विट आता नितेश राणेंच्याच अंगलट आल्याचं पहायला मिळत आहे. राणेंनी केलेल्या ट्विटमुळे झाले असून राणेंनी माफी मागावी अशी मागणी केली जात असतानाच त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काही अजब प्रकार घडल्याचं पहायला मिळालं. भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

नितेश राणे हे अधिवेशनाच्या बाहेर पायऱ्यांवर आंदोलन करत होते. यावेळी आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत होते. आदित्य ठाकरे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या. त्यांची घोषणा ऐकताच भाजप नेत्यांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, 5 दिवसांचं हिवाळी अधिवेशन सुरु झालं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये वादावादी पहायला मिळत आहे. अनेक मुद्द्यांवरुन हमरीतुमरी होत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मी मुस्लीम असूनही कधीच मुस्लीम मुलाशी लग्न करणार नाही,” ‘या’ अभिनेत्रीचा खुलासा

आज इंधनदरात काय बदल झाला?; वाचा पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

“2014 ला नरेंद्र मोदी हे उगाच निवडून आले नाहीत, भाजप हा…..”

Aryan Khan Case: आर्यन खान प्रकरणाचा तपास स्थगित; ‘हे’ कारण आलं समोर

‘नितेश राणेंनी माफी मागावी’; राणेंच्या ‘त्या’ ट्विटनं शिवसैनिक आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More