बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Monsoon Assembly 2022 | अजित पवारांनी प्रश्न विचारताच तानाजी सावंत गडबडले, वाचा नेमकं काय घडलं?

मुंबई | सध्या अधिवेशनाचा ( Monsoon Assembly 2022 ) दुसरा दिवस सुरू असून सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घेरण्याचं काम विरोधक करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात एक प्रश्न उपस्थित केला.पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. यावेळी उत्तर देताना तानाजी सावंत गडबडले.

वाचा नेमकं काय घडलं?

पालघरमधल्या बालकांच्या हत्तीरोगावरुन विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घेरलं. अजित पवार यांनी पालघरमध्ये किती जागा रिक्त आहेत?, असं विचारलं.

प्रश्न राखून ठेवावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. अखेर हा प्रश्न राखून ठेवण्यात आला. पण अजितदादांच्या प्रश्नाचं उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More