बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पदभार स्वीकारताच नारायण राणे अॅक्शन मोडमध्ये, पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना झापलं

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल बुधवारी सायंकाळी पार पडला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना काल मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज इतर मंत्र्यांंबरोबर नारायण राणे यांनी देखील कार्यभार स्वीकारला आहे.

नारायण राणे यांनी कार्यभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी आपला दणका दाखवण्यास सुरुवात केली आहे. पदभार स्वीकारताच राणेंनी आज सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत राणेंनी सर्व कामाचा आढावा घेतला. मात्र, अधिकारी बैठकीला तयारी करून आले नसल्याचं नारायण राणेंच्या लक्षात आलं.

यामुळे राणेंनी आपल्या सर्व स्टाफला बाहेर जाण्यास सांगितलं आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. जवळपास राणेंनी अर्धातास सर्व अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. यानंंतर मंत्रालयातील सरकारी बाबूंची चांगलीच धांदल उडाली. मी मंत्रालयात पदभार घ्यायला येणार आहे, हे माहीत असताना देखील तयारी का केली नाही, असा सवाल राणेंनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना केला आहे.

दरम्यान, काल राणेंना मंत्रिपदाचा शपथ घेण्याचा पहिला मान देण्यात आला होता. पदभार स्विकारल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हटले होेते की, देशाचा जीडीपी कसा वाढेल तसंच देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल, यासाठी मी विचार करेन.

थोडक्यात बातम्या –

“आघाडीची चिंता न करता शिवसेना बळकट करा, शिवसैनिकांच्या पाठिशी पक्ष खंबीरपणे उभा”

इगतपुरी रेव्ह पार्टीमध्ये अटक झालेल्या हीना पांचाळसह 25 जणांना न्यायालयीन कोठडी

क्रिती सेनाॅनने ओटीटीवर रिलीज होणाऱ्या ‘मिमी’ चित्रपटातील लुक केला शेअर

कौतुकास्पद! गरजूंना मोफत जेवण देणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा ब्रिटनकडून सन्मान

मंत्रिपद मिळताच ज्योतिरादित्य शिंदे मोदींविरोधात आक्रमक?, जाणून घ्या काय आहे सत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More