अत्यंत धक्कादायक घटना; मुलीचं प्रेमप्रकरण कळताच बापाने केलं भयानक कृत्य
नाशिक | नाशिकच्या (Nashik) अंबड लिंक रोडवरील चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली. या परिसरात राहणारे रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते.
मुलीचे हे प्रेमसंबंध वडील रामकिशोर यांना मान्य नव्हतं. मुलीचे प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापानेच पोटच्या लेकीची हत्या केल्याची माहिती समोर आलीये.
रामकिशोर भारती असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी पित्याचं नाव आहे. तर ज्योती भारती असे पीडित तरुणीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे
रामकिशोर आणि त्यांच्या मुलीमध्ये वारंवार भांडण होत होतं. नेहमीप्रमाणे आज देखील संशयित रामकिशोर आणि त्यांची मुलगी ज्योती भारती यांचं भांडण झालं.
राग अनावर झाल्याने त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने ज्योती हिचा गळा आवळून तिची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.