बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्रिपद मिळताच ज्योतिरादित्य शिंदे मोदींविरोधात आक्रमक?, जाणून घ्या काय आहे सत्य

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना काल मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहेे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या फेसबुक वॉलवरुन रात्री 12.23 वाजता पंतप्रधान मोदींविरोधातील आक्रमक भाषण केलेला जुना व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

ज्योतिरादित्य शिंदे ज्यावेळी काँग्रेसमध्ये होते त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. मात्र, हा व्हिडीओ शिंदे यांनी नव्हे तर कोणी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अकाउंटवरुन अपलोड केला होता.  हा व्हिडीओ समोर येताच काही मिनिटांतच सायबर टीमने हे हॅकिंग थांबवलं.

हॅकरने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वॉलवरुन काही जुने फोटोज देखील शेअर केले होते. सायबर टीमने हे फोटोज देखील हटविले आहेत. ज्या हॅकरने हे कृत्य केलं होतं, त्याबद्दल देखील माहिती मिळाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राष्ट्रपती भवनात कालचा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वात आधी नारायण राणे यांंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी हिंदीत आणि ईश्वर साक्षीने शपथ घेतली आहे.

थोडक्यात बातम्या –

मुंडे भगिनी नाराज?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहित होती, म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं”

शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही – नारायण राणे

‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ट्वीटवर उर्मिला मातोंडकर भडकल्या

अभिमानास्पद! पुण्याच्या चिमुकलीनं जागतिक विक्रम करत 3 रेकाॅर्ड बुकमध्ये नोंदवलं नाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More