बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धावबाद होताच फलंदाजाने रागाने फेकली बॅट अन्…; पाहा व्हिडीओ

मुंबई | कालपासून आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. केविन पीटरसन आयपीएल दर्शवणाऱ्या ‘स्टार स्पोर्ट्स’मध्ये समालोचन करत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

केविन पीटरसनने शेअर केलेला व्हिडीओ इंग्लंडमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये प्रौढ नागरिकांच्या क्रिकेटमध्ये एक फलंदाज धावबाद झाला आहे. क्रिकेट खेळताना चिडलेल्या फलंदाजाने नॉन स्ट्राईक फलंदाजाच्या दिशेने बॅट फेकली आहे. सुदैवाने नॉन स्ट्राईकवर असणाऱ्या फलंदाजाला जास्त दुखापत झाली नाही. व्हिडीओमध्ये गोलंदाजाने चेंडू फेकल्यावर स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाने रन काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हा प्रकार घडला.

फलंदाजाने जोडीदारासोबत रन काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, गोलंदाजाने थ्रो फेकल्यानंतर नॉन स्ट्राईकवर असलेला खेळाडू बाद झाला. स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाच्या दिशेने रागाने बॅट फेकून मारली. यानंतर नॉन स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाला तो समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर दुसरीकडे खेळाडू बाद झाला म्हणून गोलंदाजी करणारे खेळाडू आनंद व्यक्त करत आहेत.

दरम्यान, सुदैवाने फलंदाजाला कसलीही दुखापत झाली नाही. त्याचवेळी रन आऊट झालेल्या फलंदाजाला चूक लक्षात येताच स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाची माफी मागितली. पीटरसनने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

पाहा व्हि़डीओ –  

 

थोडक्यात बातम्या –

तालिबानमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबरदारी ‘या’ संघटनेने स्वीकारली!

“फडणवीसांनी टाकलेल्या आमदारकीच्या तुकड्यासाठी पडळकर बेताल वक्तव्य करतात”

“अहो पाटील, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना माहित आहे अजित पवार काय आहेत”

“किरीट सोमय्यांचं नाट्य म्हणजे मराठी रंगभूमीचा अपमान”

‘ब्युरोक्रेसी काहीच नाही, ते आमच्या चपला उचलतात’; उमा भारती यांचं वादग्रस्त वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More