बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल तर… – राहुल गांधी

नवी दिल्ली | जेएनयु विद्यार्थी संघटनाचा माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमारने खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी सुद्धा राहुल गांधींना संविधानाची भेट देत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कन्हैया कुमारने काॅंग्रेसमध्ये प्रवेश करताच केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. त्याचवेळी राहुल गांधींनी सुद्धा भाजपवर टीका केली.

राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राहुल गांधींनी केलेल्या भाषणात सावरकर, भारतीय संविधान आणि आयडीया ऑफ इंंडियाचाही वारंवार उल्लेख केला. जर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल. तर तुम्हाला भारत हा भूगोलच दिसेल. कारण ते पेन घेतात, नकाशे काढतात आणि भारत सांगतात. या रेषेच्या बाहेर जे आहे तो भारत नाही. अन् या रेषेच्या आतमध्ये जो दिसतो आहे तो भारत आहे, असे ते सांगतील, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

भारत हा एक प्रदेश आहे, असंही ते म्हणतील. परंतु भारत हा एक हिंदू-मुस्लिम-शिख धर्मींयाचा आहे. हिंदी, तामिळ, बंगाली, उर्दू, तेलगु या सगळ्यांचं भारतात नातं आहे. आपल्यातलं हे नातं फोडण्याचं काम सध्या पंतप्रधान करत आहेत. ते भारताच्या सौर्वभौमत्वावरच हल्ला करत आहेत. मात्र लोकांमध्ये नात्यांचा हा पुल बांधणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी त्यांना विरोध करतो असंही राहुल गांधी यांनी सांगितलं.

दरम्यान,  मी स्पष्टपणे सांगतो की, पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील, परंतु आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फार्म भरला आहे. तेव्हा आमचा सहकारी जिग्नेश मेवाणी यांनी संविधानाची प्रत आणि मी गांधी- आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो भेट म्हणून राहुल गांधीना दिला आहे. कारण या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची साथ आवश्यक आहे. असंही कन्हैया कुमारने म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही शेतकरी गेलो सरणावर अन् माझ्या सरणावरची फुले मंत्र्यांच्या अंगावर”

“शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचलं पाहिजे, रस्त्याच्याकडेला उभं राहून पाहणी करू नका”

“शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी”

“हे तर भाजपचं षडयंत्र, कारवाईची माहिती भाजप नेत्यांनाच समजतेच कशी?”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More