बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गिअर टाकताच पठ्ठ्याची गाडी शिरली थेट दुकानात, पाहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असलेले पहायला मिळतात. सोशल मीडिया माध्यम हे असं माध्यम आहे जिथे कधी काय व्हायरल होईल असं सांगता येत नाही. लोक एका रात्रीत प्रसिद्ध होईल जातात. अशातच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ भिवंडीतील असून व्हिडीओमध्ये एका पठ्ठ्यानं थेट गाडी दुकानात घातल्याचं पहायाला मिळत आहे.

भिवंडीतील या व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये एका पठ्ठ्यानं गाडीला गिअर टाकत गाडी थेट दुकानात घातली. त्यानं गाडीला गिअर टाकल्यावर त्याचा तोल गेला त्यामुळे तो थेट फोटो स्टुडिओच्या दुकानात शिरला. यामध्ये स्टुडिओतील बऱ्याच गोष्टींचं नुकसान झालं. मात्र सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही.

ही संपूर्ण घटना फोटो स्टुडिओतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर भन्नाट कमेंट केल्या असून हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पहायला मिळाले आहेत. ज्यांच्या गाडीवरचं संतुलन सुटल्यानं गाड्या दुकानात, मंदिरात घातल्या आहेत. असे व्हिडीओ लगेच व्हायरल होत असतात.

पाहा व्हिडीओ – 

 

थोडक्यात बातम्या – 

“वानखेडे प्रकरणी आता मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधान मोदींना पत्र”

मुकेश अंबानींची मोठी उडी! आता पेट्रोलियम क्षेत्रात घडणार नवी क्रांती?

‘…तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन’, वानखेडे-मलिक वाद विकोपाला

बाप बापच असतो! ग्रामपंचायत निवडणुकीत बाप-लेक भिडले अन्…

”ती’ खोली हेच स्वातंत्र्याचं खरं सत्य’; सेल्युलर जेलला भेट दिल्यानंतर कंगना भारावली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More