बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हनीमूनला जाताच पत्नीसमोर आलं पतीचं सत्य, त्यानंतर पत्नीनं केलं असं काही की,…

नवी दिल्ली | लग्न म्हणजे दोन व्यक्ती आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत एका बंधनात अडकले जातात. त्यात काही जण आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लग्नागाठ बांधतात. तर प्रेमाखातर दोन पुरूष एकमेकांसोबत लग्न करतात, तर दोन महिला सुद्धा लग्नगाठ बांधतात. मात्र, लग्न म्हणजे जीवनाच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देणं. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. लग्नानंतर हनीमुनला गेल्यावर पतीनं आपल्या पत्नीला त्याची सत्यता सांगितली त्यानंतरही त्याच्या बायकोनं त्याची साथ दिली.

33 वर्षाचा जॅक आणि 30 वर्षाच्या हार्वीनं 2018 मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर दोघही हनीमूनसाठी विस्टशायरच्या सेंटर पार्क्समध्ये गेले. तिथेच हार्वीला समजलं, की तिचा पती जॅकच्या आत एक मुलगा नसून मुलगी आहे. ही गोष्ट माहिती झाल्यानंतर मेकअप आर्टिस्ट असलेल्या हार्वीनं त्याला सोडून देण्याऐवजी त्याची साथ देण्याचा निर्णय घेतला. आता दोघंही पुन्हा एकदा नव्यानं लग्नगाठ बांधण्याचा विचार करत आहेत. ज्यात जॅकला त्याचं सत्य लपवण्याची गरज नसेल.

जॅक आणि हार्वी यांची ओळख 2007 मध्ये ऑनलाईन झाली होती. 2010 मध्ये ग्राफिक डिझायनर जॅक आणि हार्वीचं नातं प्रेमात बदललं. यानंतर साल 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. 30 नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. 2 महिन्यांनंतर जॅकनं आपल्या पत्नीला सांगितलं, की त्याला नेहमीच एक ट्रान्सजेंडर बनण्याची इच्छा होती. त्याची पत्नी हार्वीनं सांगितलं, की तिच्या पतीला वयाच्या 11 व्या वर्षीपासूनच मुलगी बनण्याची इच्छा होती. ही गोष्ट हार्वीला समजली तेव्हा तिनं 45000 पाउंड खर्च करुन आपल्या पतीची सर्जरी करत महिला बनण्यासाठी त्याची मदत केली. तिनं सांगितलं, की जेव्हा तिच्या पतीनं पहिल्यांदा मुलीचा ड्रेस घातला आणि तिनं स्वतःत त्याचा मेकअप केला तेव्हा जॅकवरुन रायना बनल्यावर तिचा पती अत्यंत आनंदी होता.

दरम्यान, हार्वी आता रायना म्हणजेच जॅकसोबतच पुन्हा एकदा लग्नगाठ बांधण्याचा विचार करत आहे. ती म्हणाली, की यावेळी आम्ही दोघीही ब्लॅक कलरचा ड्रेस घालणार आणि रायना नवरीप्रमाणं सजून आपलं स्वप्न पूर्ण करणार. दोघांना या गोष्टीचाही आनंद आहे की, सोशल मीडियावरही लोक त्यांना साथ देत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, तर…’; अभ्यासातून नवी माहिती समोर

भाई जगतापांची पोलिसांना धक्काबुक्की; भाई जगतापांसह 50 जणांवर गुन्हा

पालकमंत्री छगन भुजबळांना डच्चू?; संजय राऊतांच्या वक्तव्यानं खळबळ

जुन्या परंपरेला फाटा देत पाच मुलींचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा; लाडक्या बाबांना पोरींचा अखेरचा निरोप

“सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याला मारलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More