बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे मंत्री एकत्र येतात अन् मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात”

पुणे | ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काच आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपने चक्का जाम आंदोलन केलं होतं. तसेच आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील ओबीसी मंत्री एकत्र झाले असल्याचं दिसून येत आहे. यावर माजी आमदार तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर येताच ओबीसी समाजाचे सर्व मंत्री एकत्र येतात, मात्र मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात, खरं तर हेच मराठा समाजाचं मोठं दुर्दैव आहे, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. यासंदर्भात नरेंद्र पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं आहे.

समाजाला डावलून राजकारणाला उराशी धरणाऱ्या विकृतीला मराठा बांधव नक्कीच उत्तर देतील, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व पक्षीय नेत्यांनी एकजूट दाखवत आरक्षण मिळवण्याबद्दलचा निर्धार व्यक्त केला. ओबीसी आरक्षणासाठी समाजातील सर्व मंत्री आणि नेते एकत्र आल्याचं बघायला मिळालं.

लोणावळा येथे ओबीसी व्हीजेएनटी चिंतन मंथन शिबिर पार पडलं. नरेंद्र पाटलांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. त्याच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सत्ताधारी पक्षांतील मंत्री आणि नेत्यांसह इतर पक्षांतील नेतेही उपस्थित होते.

 

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते, महाराष्ट्राला त्यांची गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे- संजय राऊत

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More