बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. मला प्रेम पत्र आलं आहे. ते इनकम टॅक्सचं प्रेमपत्र आहे. 2004, 2009, 2014 आणि 2020 च्या लढवलेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राबद्दल इन्कम टॅक्सने नोटीस पाठवली आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.

नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

ईडीसारख्या (ED) एजन्सीद्वारे महाराष्ट्रातील अनेक आमदारांची चौकशी सुरू आहे. ईडीचा उपयोग राजकीयदृष्या केला जात आहे, असं शरद पवार म्हणालेत.

इन्कम टॅक्स, ईडी व सीबीआयचा (CBI) राजकीय वापर चिंताजनक हा चिंताजनक आहे. वेगळ्या विचारांच्या व्यक्तींविरुद्ध ईडी या एजन्सीचा वापर होतो, असंही शरद पवार (sharad pawar) म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘भाजपला अटलजींच्या विचारांची गरज’; ‘सामना’तून भाजपवर टीकेचे बाण

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कळल्यावर मी गादीवर दणादणा उड्या मारल्या”

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘एकनाथ शिंदेजी अभिनंदन, पण…’; शुभेच्छा देत राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More