बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“170 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा पोकळ, ठाकरे सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं”

मुंबई | राज्याच हिवाळी अधिवेशन (Winter Session) बुधवारी म्हणजेच उद्यापासून सुरू होत असून विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. विधानसभा अध्यक्षनिवड आणि बहुमताच्या संख्याबळ यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारल घेरलं आहे. (Devendra Fadnavis criticizes Mahavikas Aghadi government)

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘पेपरमध्ये वाचायला मिळालं आहे की, या अधिवेशनात अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. 12 आमदार बाहेर ठेवून अध्यक्षांची निवडणूक घ्यायची म्हणजे सरकार किती असुरक्षित आहे. राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झालेली असताना देखील नियमबाह्य पद्धतीने अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा घाट घातला जातोय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तसेच 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत होते हे किती पोकळ आहे हे लक्षात येत असल्याचं देंवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांनी बोलू नये, त्यांची तोंड बंद करण्यासाठी एकेक वर्षासाठी आमदारांना निलंबित करणे म्हणजे राज्याच्या इतिहासात काळिमा फासण्याचं काम सरकारच्या दबावाखाली होत आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, ज्या घटना घडल्या नाहीत, त्यांची कारण सांगून आमदारांना निलंबित केलं गेलं. शिवसेना (Shiv Sena)
, राष्ट्रवादी(NCP) आणि काँग्रेस(Congress) म्हणजेच महाविकास आघाडी सरकारचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरासाठी निलंबित करण्याचं एवढचं कारण आहे की, सरकारला स्वत:च्या आमदारांवर विश्वास नाही. सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं, असा ठाम विश्वास यांच्या मनात आहे. याकारणामुळे मुद्दामून आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

दहावी बारावी परिक्षांचं वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिसाहात नोंद होईल”

गडकरी म्हणतात,”लखीमपूर घटना म्हणजे केवळ अपघात, राजीनामा मागणं चुकीचं”

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला जोरदार झटका; मतदानाच्या दिवशीच बाप-लेकाला अटक

iphone 13 सिरीजवर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ही बंपर ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More