“मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून…”; इम्तियाज जलील यांची जहरी टीका
मुंबई | राज्यात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आक्रमक हिंदूत्वाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. औरंगाबाद येथील सभेत बोलताना राज ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. या ठिकाणी राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात अनेक नियमांंचं उल्लंघन झाल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करताना प्रभावी आणि देशद्रोहाची कलमं वापरली नसल्यावरून वाद निर्माण झाला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगाबादमधील मैदान देतानाच चूक केली, असं जलील म्हणाले आहेत. तीन दिवस पोलिसांनी अभ्यास केला आणि आता हे तर खोदा पहाड निकला चुहा असं झाल्याची टीका जलील यांनी केली. सगळ्यांनी मिळून ही सोपी कलमं लावली आहेत. कारवाई दाखवायची म्हणून ही कलमं लावली, असा आरोप जलील यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून गंभीर कलमं लावण्यात आली नाहीत, असा आरोप देखील जलील यांनी केला आहे.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या सभेवरुन सध्या राज्यात वातावरण जोरदार तापलं आहे. सभेतील चिथावणीखोर वक्तव्यावरुन राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
थोडक्यात बातम्या –
मुंबई पोलिसांकडून ‘इतक्या’ मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी
‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही’; राज ठाकरेंचा पुन्हा गंभीर इशारा
”…त्यासाठी कुणाच्याही परवानगीची वाट पाहू नका’; मुख्यमंत्र्याचे आदेश
मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांची गर्दी, पोलिसांचा ताफा वाढवला
“राज्याच्या बाहेरुन काही गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव”
Comments are closed.