बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलगी झाली म्हणून विवाहितेसोबत तिच्याच कुटुंबियांनी केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

पुणे |  पुणे शहरामध्ये महिलांविरुद्धचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी महिलेवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये पुणे एक नंबरला असल्याची बातमी समोर आली होती. अशातच आता आणखी एक घटना समोर आलेली आहे. एका विवाहितेने मुलीला जन्म दिला म्हणून तिचा छळ करण्यात आला. एवढंच नाही तर या छळामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे.

संबंधित घटना ही पुण्यातील पिंपरी येथील आहे. येथे रहिवासी असणाऱ्या एका महिलेने मुलीला जन्म दिला आहे. या घटनेमध्ये एकूण 5 जणांचा समावेश असून ही 5 लोकं महिलेच्या परिवारातील सदस्य आहेत.

महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवली आहे. आपल्या तक्रारीमध्ये आरोपींनी ठरवून तिचा छळ केला असून महिलेकडून माहेरुन पैसे आणण्याची देखील मागणी केली होती. मात्र तिने ते आणले नाहीत. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन देखील तिचा छळ करण्यात येत होता.

दरम्यान, भोसरी पोलीस ठाण्यात महिलेने पाचही जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तसेच पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून आता पुढील तपास चालू आहे. संबंधित महिलेचा छळ एप्रिल 2016 पासून चालू असल्याचं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शाइनिंग करत पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग करायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

देशात कोरोना मृतांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा ओलांडला; नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

“तुझ्या पुतण्यानं आमच्या मुलीला पळवलं”, महिलेचा विनयभंग करुन मारहाण

चार टप्प्यात राज्यातील लाॅकडाऊन उघडण्याची शक्यता; राजेश टोपे यांचं सुचक वक्तव्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More