बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवरा दलित आहे म्हणून आई-वडिलांनी गरोदर मुलीसोबतच केलं हे धक्कादायक कृत्य

तमिळनाडू | आजही आपल्या देशातील अनेक लोक कर्मठ रुढीपरंपरेमध्ये गुंतलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला अनेक आश्चर्यजनक घटना घडताना दिसतात. असाच काहीसा प्रकार रेणूका नावाच्या एका मुलीसोबत घडला आहे.

रामनाथपुर येथे राहणाऱ्या रेणुकाने आई-वडिलांच्या विरोधात जाऊन पेरुमल नावाच्या एका तरुणाशी तिरुपूर येथे लग्न केलं. रेणुका वान्नियार या इतर मागासवर्गीय समाजातील असून तिचा नवरा पेरुमल हा दलित समाजातील आहे. त्यामुळे या लग्नाला रेणूकाच्या घरच्यांचा विरोध होता. तरीही त्यांनी लग्न केलं.

रेणूकाला तिच्या आईने 21 जानेवरीला आपण आजारी असल्याचं सांगत माहेरी बोलावून घेतलं. रेणूका 4 महिन्यांची गर्भावती होती हे त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी तिला घरात कोंडून ठेवलं आणि नवऱ्याशी संपर्कही साधू दिला नाही. 26 जानेवारीला रेणूकाला तिच्या आई वडिलांनी अत्तुर इथल्या रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला.

दरम्यान, रुणूकाचा नवरा पेरुमलला हा प्रकार समजताच त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल करताच पोलिसांनी रेणूकाच्या आई वडिलांना अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“बारामती अ‍ॅग्रोमधील कॉन्ट्रॅक्ट फार्मींग बंद करा मग गाझीपूरला जावा”

क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का; कंगणाचा रोहितला रिप्लाय

“मी शेतकऱ्याची लेक म्हणून बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार”

“माझी वाट लागली तरी चालेल, पण त्याला संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही”

हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More