बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नावाप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानातही धावांचा विक्रम केलाय ‘या’ खेळाडूने

नवी दिल्ली | स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून केली. त्यानंतर धोनीच्या सर्वात जवळचा मानला जाणारा फलंदाज सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक फोटो टाकून निवृत्तीची घोषणा केली. सुरेश रैनाने एक आगळावेगळा विक्रम केला आहे.

सुरेश रैनाने क्रिकेटमधील तीन स्वरूपात आपला विक्रम करून ठेवलाय. कसोटी, एक दिवसीय आणि टी २० अशा तीनही प्रकारात रैनाने एका उत्तम फलंदाजाची भूमिका पार पाडली आहे.

२५ जून २००८ रोजी हाँग काँग विरुद्धच्या एक दिवसीय सामन्यात पहिले शतक केले होते. त्या सामन्यात १०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २६ जुलै २०१० रोजी भारताचा श्रीलंकेविरुद्ध सामना होता. त्या सामन्यात रैनाने शतक केले होते. पहिल्याच डावात रैनाने १२० धावा केल्या होत्या.

२ मे २०१० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रैनाने शतक केले होते. त्या सामन्यात त्याने १०१ धावा केल्या होत्या. सुरेश रैना कसोटी, एक दिवसीय आणि टी २० अशा तीनही प्रकारात शतक करणारा भारताचा पहिला खेळाडू आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात ‘लिव्ह इन रिलेशन’चा थरार! गरोदर प्रेयसीला ठार करून प्रियकर म्हणतो “मला फाशी द्या”

…म्हणून धोनीने आत्ताच निवृत्ती जाहीर केली- सुनील गावसकर

“प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक दिवस शेवट होतो, पण…

सुरेश रैना अन् MS धोनीच्या त्या 5 दिलखेचक पार्टनरशीप ज्यांनी मॅच हातोहात फिरली…!

धोनीच्या ‘या’ विक्रमाशी त्याच्या आधी आणि नंतर कुठल्याही कर्णधाराला बरोबरी करता आली नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More