बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची धक्कादायक आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसात दिलासादायक असल्याचं समोर आलं होतं. पण आता हा आकडा पुन्हा एकदा हळुहळु वाढत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 4 हजार 192 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 5 हजार 650 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या दिलासादायक असताना मागच्या 24 तासातील  आकडेवारी ही काही प्रमाणात वाढली असल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 64 हजार 018 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 88 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 5 लाख 66 हजार 051 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने कमी होत होती. पण मुंबईतील मागच्या कोरोना रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसात वाढत असल्याचं चित्र  दिसून येत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

काय सांगता! पोलार्डने बॅटने नाही कर हेलमेटने मारला चौकार, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्रातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढला; 15 मे पर्यंत अंमलबजावणी कायम

फुफ्फुसांव्यतिरिक्त ‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन, वेळीच व्हा सावध!

तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…- हेमंत ढोमे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More