बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बॅनरवर फोटो लावला नाही म्हणून शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा!

उस्मानाबाद | आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने राज्यभरात संपर्क अभियान सुरु केलं आहे. मात्र, या संपर्क अभियानाच्या संदर्भातील बॅनरवरुन उस्मानाबादमधील शिवसैनिकांच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख अण्णा जाधव यांच्यासह काही शिवसैनिक गंभीर जखमी झाले आहेत.

सध्या चालू असणाऱ्या शिवसेना संपर्क अभियानाचे सर्व तालुक्यात बॅनर लावण्यात आले आहेत. परंतु, या बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो लावण्यात आला नाही. यामुळे विद्यमान आमदार डॉ तानाजी सावंत यांचे कार्यकर्ते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि पुढे याच बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अण्णा जाधव यांच्यावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. समोरच्या गटातील तब्बल 25 जणांनी लाठ्या काठ्या आणि काचेच्या बाटल्या घेवून अण्णा जाधव यांच्यावर हल्ला केला. सध्या जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

दरम्यान, शिवसैनिकांमध्ये झालेल्या या राड्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, अद्याप विद्यमान आमदार डॉ तानाजी सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. ते याप्रकरणी काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“हिच्यासोबत जाणार नाय खूप मारते हो”, तरुणाच्या तक्रारीनंतर तरुणीचा पोलीस स्टेशनमधेच राडा

“माफ करा तांत्रिक कारणामुळे आज इंधन दरवाढ झाली नाही; असुविधेसाठी दिलगीर आहोत”

‘सामना’वरुन घमासान; नाना पटोले आक्रमक… म्हणाले, सूर्यावर थुंकू नका!

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; तब्बल इतक्या दिवसांपर्यंत पोलिस कोठडी

…अन् मला नग्न होण्यास सांगितलं, प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे कुंद्राच्या अडचणी वाढल्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More