बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटका, राज्याला संकुचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री लाभला”

मुंबई | शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर भाजप मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. भाजपच्या तुषार भोसलेंनी मेळाव्यातील भाषणावर टीका केली आहे.

ठाकरे कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला त्याठिकाणीच ठेचून टाकू अशी भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारल्याच्या घटनेला आता दीड वर्ष झालं आहे. पण त्यांच्या हत्याकऱ्यांना अद्याप शिक्षा होऊ शकली नाही, साधं त्यांच्या विरोधात आरोपपत्र देखील सुद्धा दाखल होऊ शकलं नाही, असं भाजपच्या तुषार भोसलेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात येऊन हिंदू धर्माला सडका म्हणणारा शर्जिल उस्मानी अद्याप मोकाट आहे. त्याला कसलीही शिक्षा झाली नाही आणि वरून पुन्हा हिंदूत्वाचा आव आणायचा. तुमच्या ढोंगी हिंदूत्वाचा बुरखा फाटला आहे, अशी टीका तुषार भोसलेंनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा कुटुंबप्रमुख असतो. पण, मुख्यमंत्र्याचं कुटुंब हे फक्त ठाकरे कुटुंब आहे. महाराष्ट्र हा त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केलं आहे. महाराष्ट्रचं दुर्देव्य आहे की, इतक्या संकुचित मनोवृत्तीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रूपात राज्याला लाभला आहे, अशी जोरदार टीका तुषार भोसलेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

थोडक्यात बातम्या –

ना रोहित ना विराट, बाबर आझम म्हणतो ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमध्ये धमाका करेल

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का?’, शरद पवार म्हणतात…

“राज ठाकरे आणि नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर का पडावं लागलं?”

”मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने…’; शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

‘राज कुंद्राने माझ्याकडून अंगप्रदर्शन करून घेतलं आणि…’; शार्लिन चौप्राचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More