“जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी… तेणे पत्थ्य सांभाळावी”, मोदींना खोचक टोला
मुंबई | वारकरी सांप्रदायाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि शिष्टमंडळाने पंतप्रधानांना संत तुकारामांची पगडी, तुळशीहार, उपरणे आणि वीणा देऊन सत्कार केला होता. तसेच वारकरी सांप्रदायाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच आमंत्रण देण्यात आलं होतं.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधानांच्या फोटोवरून खोचक टीका केली आहे. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पत्थ्य सांभाळावी, असं ट्विट अमोल मिटकरींनी केलं आहे. विठ्ठलाची सेवा किंबहुना भक्ती करणाऱ्या व्यक्तीने काही नियमांच पालन करणे आवश्यक आहे, अशा अर्थाचं हे संतवचन आहे.
संत तुकाराम महाराजांच्या मंदिर शिळा लोकार्पण करणे हे मी माझं भाग्य समजेन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना शिळा मंदिराच्या कामाला सुरूवात झाली होती. आता मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, अशी वारकऱ्यांची इच्छा असल्यामुळे पंतप्रधानांना आमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात वीणा, चिपळी आणि तुळशीहारासह घेतल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पंतप्रधानांच्या या फोटोंवरून अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी समर्थन केलं आहे तर काहीजण विरोध दर्शवत राजकारण करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यातच आता अमोल मिटकरींनी बोचरी टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“गली गली में शोर है, भाजपवाले चोर है”, दरेकरांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
“नीरव मोदींच्या बंगल्याप्रमाणे नारायण राणेंचा अधीश पाडा”, प्रकरण सुप्रीम कोर्टात
सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडणार, 1 एप्रिलपासून होणार ‘हे’ मोठे बदल
महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, 25 पेक्षा जास्त आमदारांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
1 एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवणार पण…; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
Comments are closed.