मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेनं संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातारण पेटल्याचं पहायला मिळत आहे.
राज ठाकरेंच्या सभेनंतर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी (Asaduddin Owaisi ) यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांचं भाषण हिंसा भडकणारं होतं. त्यामुळे पोलीस त्यांची गंभीर दखल का घेत नाही, असा प्रश्न औवेंसींनी उपस्थित केला आहे.
नवनीत राणा यांच्यावर कारवाई होऊ शकते तर राज ठाकरेंवर कारवाई का होऊ शकत नाही?, राज ठाकरेंना तुरुंगात टाका, त्यांचं डोकं शांत होईल, असा खोचक टोला औवेसींनी लगावला आहे.
दरम्यान, काल झालेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर आज सकाळपासून त्यांच्यावर टीकांचा भडीमार होत आहे. अनेकांनी त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी ! नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
औरंगाबादमधल्या गर्जनेनंतर राज ठाकरेंचं पहिलं ट्विट, म्हणाले…
लसीकरणाविषयी सुप्रीम कोर्टानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
‘महाराष्ट्रात हुकुमशाही चालणार नाही’; अजित पवारांचा गंभीर इशारा
मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अमृता फडणवीसांचा पलटवार, म्हणाल्या…
Comments are closed.