बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोण राहुल गांधी?, मी त्यांना ओळखत नाही”

नवी दिल्ली | पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवरील राजकारणात गरमा गरमी पाहायला मिळत आहे. त्यात ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) व शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात काँग्रेस विरहीत आघाडीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस विरहीत आघाडीचा सुतोवाच केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना एमआयएमचे (MIM) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

गेले काही वर्ष काँग्रेस (Congress) सोबत राहिल्याने मी सांगू इच्छितो की येत्या दोन-तीन वर्षांत काँग्रेस फुटेल, असा दावा ओवेसी यांनी केला आहे. राहुल गांधी कोण आहेत? मी त्यांना ओळखत नाही. तुम्हाला कोणाला ते माहिती असतील तर मला सांगा, असा घणाघात ओवेसी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.

आम्हाला प्रत्येक पक्षाची बी टीम म्हणून ओळखले जाते, असंही ओवेसी पुढे बोलताना म्हणाले. तर तुम्ही जर राहुल गांधींना इथे बोलावले तर ते भाजपसारखीच भाषा बोलतील आणि तीच भाषा अखिलेश यादवही (Akhilesh Yadaw) बोलतील, अशी खोचक टीका ओवेसी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicronचा धोका वाढला! द.आफ्रिकेतून आलेल्या महिलेने केलंं असं काही की…

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच आहे का?”, अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? तिसऱ्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं…

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; आता मुख्य परीक्षा ‘या’ तारखेला होणार

बुस्टर डोसची गरज आहे का?, असेल तर कोणती लस घ्यावी?; तज्ज्ञ म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More