राजू आता संपला आहे; ओवैसींनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

मुंबई | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आता ओवैसींनी राज ठाकरेंना ‘राजू’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. 

राजू आता संपला आहे आणि त्याला हे समजायला हवं, असं ट्विट असदुद्दीन ओवैसी यांनी केलं आहे. 

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन टीका करताना राज ठाकरे यांनी ओवैसींवर निशाणा साधला होता. सरकार ओवैसीच्या मदतीने दंगल घडवू पाहात आहे, असा आरोप त्यांनी केला होता. 

दरम्यान, ओवैसींनी राज यांच्या या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी इतका प्रसिद्ध झालोय की राजकीय सभांमध्ये आता माझं नाव घेतलं जातंय, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

-भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या योद्ध्याची क्रिकेटमधून निवृत्ती

-“मुज्जफरनगर आणि कैराना प्रमाणे ‘बुलंदशहर’ घडवलं जात आहे का?”

-महाराष्ट्राची सत्ता राज ठाकरेंकडे द्या; ते महाराष्ट्राची अस्मिता जपतील!

-सरकारवर टीका करण्यासाठी मला तुमच्या व्यासपीठाची गरज नाही!

-विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचं निधन