हैदराबाद | एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदी यांना चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचं आव्हान दिलं आहे.
भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर हैदराबादमध्ये सर्जिकल स्ट्राईक करु, असं वचन दिलं आहे. भाजप लडाखमध्ये अशी बहादुरी का दाखवत नाही, जिथे चिनी सैन्यांनी भारताच्या भूमीवर ताबा घेतला आहे, असं ओवैसी म्हणालेत.
गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारताच्या भूमीवर चिनी फौजेने ताबा घेतला आहे. नरेंद्र मोदी तिथे सर्जिकल स्ट्राईक करा. आता शांत का बसला आहात?, असा सवाल ओवैसी यांनी केला आहे.
भाजपवाले तुम्ही असदुद्दीन ओवैसी भडकाऊ भाषण देतो असं म्हणतात. मी तुम्हाला पुन्हा आव्हान देतो, हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवा, असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस
“संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल”
तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?- देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत, ते तर…- चंद्रकांत पाटील
“अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल”