Top News देश

“हिंदू देशविरोधी असू शकत नाही मग गांधींची हत्या करणारा गोडसे कोण होता?”

हैदराबाद | हिंदू असेल तर तो देशभक्त असायलाच हवा. कारण ते त्याच्या मुळातच आहे. कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भागवत यांना सवाल केला आहे.

भागवत उत्तर देणार का?, गांधींची हत्या करणारा गोडसेंविषयी काय सांगाल? नेल्ली हत्याकांड, 1984 शीख विरोधी दंगल आणि 2002 गुजरात दंगलीला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल काय बोलणार?, असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

एका धर्माच्या अनुयायांना आपोआप देशभक्तीचं प्रमाणपत्र दिलं जात आहे. तर दुसऱ्याला आपल्याला भारतात राहायचं आहे आणि स्वतःला भारतीय म्हणण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च करावं असल्याचंही ओवैसींनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. त्यांच्या कालच्या वक्तव्यावरून ओवैसींनी त्यांच्यावर निशाणा साधला.

 

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि कायम राहतील”

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

आकडा टाकणाऱ्यांनो सावधान! वीज चोरीची माहिती देणाऱ्यास…- ऊर्जामंत्री नितीन राऊत

कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेवरून केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…

अरे बापरे.. मला भीती वाटतेय, त्यांनी तात्काळ पत्रं लिहावं- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या