“फडणवीस तुमचे नाही तर आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले”; ओवैसींचा हल्लाबोल

Asaduddin Owaisi | एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या ‘वोट जिहाद’ च्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तसंच मोदी-शाह आले तरी फडणवीस माझा सामना करु शकत नाहीत,असंही ओवैसी म्हणाले आहेत. (Asaduddin Owaisi )

फडणवीस नेहमीच ‘व्होट जिहाद’, ‘धर्मयुद्ध’, असे शब्द बोलत असतात. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का? फडणवीस तुम्ही काही आमदार विकत घेतले, मग तुम्हाला चोर किंवा दरोडेखोर म्हणावे का? गुजरातला महाराष्ट्राचे प्रोजेक्ट जात असताना ते रोखण्याची तुमची हिंमत झाली नाही का? फडणवीसांच्या तोंडातून मनोज जरांगे यांचं नाव निघेल का? ते नेहमी ‘जिहाद’ ‘जिहाद’ बोलत असतात, असा हल्लाबोल ओवैसी यांनी केला.

काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?

इंग्रज आणि मराठे युद्ध झाले, तेव्हा मुस्लिम मराठ्यांसोबत होते. मालेगावच्या किल्ल्यावर मुस्लिम उभे राहिले आणि इंग्रजांना हरवलं. ते देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वज नव्हते ते ओवैसींचे पूर्वज होते. या लढाईमध्ये मरणाऱ्यांत तुमच्या पूर्वजांचं नाव होतं का? त्यात ओवैसीच्या बापाचे नाव होते. तुमचा हिरो मात्र इंग्रजांना लव्ह लेटर लिहून ‘आय लव्ह’ लिहत होता. फडणवीस कायमच ‘लव्ह जिहाद’ झाला, ‘लँड जिहाद’ झाला, म्हणत असतात. मग तुम्ही अयोध्येत कसे हरलात हे सांगा, असा खोचक सवालही ओवैसी (Asaduddin Owaisi )यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, “तुम्हाला लाज वाटत नाही का, शहरात आठ दिवसाला पाणी येत आहे, कचरा वाढला आहे. हे फक्त हिंदू मुस्लिम करतील. मोदी म्हणतात ‘एक है तो सेफ है’. 10 वर्षांत मग आम्ही सेफ नव्हतो का? मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाने फसवणूक करण्यात आली. हे सर्व मिठाई वाटत आहेत. त्यामुळे सोडू नका, मिठाई खा. पण मतदान पतंगाला करा, असं आवाहन देखील ओवैसी (Asaduddin Owaisi ) यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“सुन लो ओवैसी हे छत्रपती संभाजीनगर आहे. आता कुणाचा बापही आला तरी छत्रपती संभाजीनगर हे नाव बदलू शकत नाही. छत्रपती संभाजी महाराजांना पडकण्यासाठी औरंगजेब संभाजीनगरमध्ये येऊन बसला. पण, 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुलवत ठेवलं. एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हरले नाहीत. मात्र, फितुरी झाली नसती तर आमचे छत्रपती संभाजी महाराज कधीच औरंगजेबाच्या हातात आले नसते”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. (Asaduddin Owaisi )

News Title :  Asaduddin Owaisi Target Devendra Fadnavis  

महत्वाच्या बातम्या –

कॉँग्रेसचा बंडखोरांना दणका, आबा बागुलांसह ‘या’ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

चंद्रकांत पाटलांच्या विजयाबाबत मेधाताई कुलकर्णी यांना विश्वास; म्हणाल्या, “सर्वाधिक मताधिक्य..”

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींची इच्छापूर्ती होणार!

“त्याने मला शारीरिक दुखापत केली…”, अखेर ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली

संविधानाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या- रामदास आठवले