बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माकडं जशी…’; असदुद्दीन ओवैसींनी आमदारांना सुनावलं

नवी दिल्ली | राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत महाविकास आघाडी सरकारला गॅसवर बसवलं आहे. शिंदे गट आणि शिवसेना नेते आणि शिवसैनिक यांच्यात वाद पेटला आहे.

एकीकडे शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करत सेना आपण अल्प मतात नाही हे सिद्ध करु पहात आहे. तर दुकरीकडे शिंदे गट भाजपशी युती करुन सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.

यावर पत्रकारांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ओवैसी म्हणाले, हा महाविकास आघाडी सरकारचा अंतर्गत प्रश्न असून मला त्यावर बोलायचं नाही. ते त्यांचे प्रश्न सोडवतील. रस्त्यांवर येऊन प्रश्न सोडवायचे की नाही हा आघाडीचा प्रश्न आहे. तो निर्णय त्यांनी घ्यावा. मला त्यात पडायचे नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात माकडांचा खेळ सुरु आहे. कोणी ह्या झाडावरुन त्या झाडावर तर कोणी त्या झाडावरुन ह्या झाडावर माकडउड्या मारत आहेत. तमाशा आम्ही पहात आहोत, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या – 

“काय झाडी.., काय डोंगार.., काय हाटेल….. मग महाराष्ट्र काय स्मशान आहे का?”

“हिम्मत असेल तर राजीनामा देऊन परत निवडणूक लढवून दाखवा”

‘कब तक छीपोगे गोहाटीमे’; झिरवळांचा फोटो शेअर करत राऊतांनी आमदारांना डिवचलं

संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांचा डुक्कर असा उल्लेख, म्हणाले…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More