आसाम | आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आज निधन झालं आहे. गोगोई 86 वर्षांचे होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी यासंदर्भात माहिती दिलीये.
तरूण गोगोई यांच्यावर गुवाहाटी रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
25 ऑक्टोबर रोजी गोगोई यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली होती. मात्र 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते.
तरुण गोगोई यांनी 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना कधीही टरबुज्या म्हटलेलं नाही, मात्र….- जयंत पाटील
शरद पवार हे 4 खासदारांचे लोकनेते; गोपीचंद पडळकर यांनी टीका
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि पथकावर ड्रग्ज पेडलर्सचा हल्ला
प्रेस नाव असलेली गाडी पुणे पोलिसांनी अडवली अन् समोर आली धक्कादायक माहिती!
शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…