लैला-मजनूपेक्षा मोदी-नितीश कुमार यांच्यात जास्त प्रेम- असदुद्दीन ओवैसी

मुंबई | निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडत आहे. यात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यामध्ये प्रचंड प्रेम आहे. त्यांच्यामधील प्रेम लैला-मजनूपेक्षाही दृढ आहे, असं म्हणत ओवैसींनी टोला लगावला आहे.

नितीश कुमार आणि मोदी यांची लव्हस्टोरी लिहली जाईल. मात्र यात लैला कोण आणि मजनू कोण हे मला विचारु नका, ते तुम्हीच ठरवा, असंही ते म्हणाले आहेत.

पंतप्रधानांनी दिलेली सबका साथ, सबका विकासची घोषणा पूर्ण फसवी आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-“डोक्याचा झालाय भुगा आणि मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे हवा गेलेला फुगा”

“महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटपेक्षा मोठा नाही”

-राहुल गांधींना चाबकाचे फटके द्या, तेव्हाच त्यांना सावरकर कळतील- उद्धव ठाकरे

-“माझी दहशत असती तर तुम्हाला उमेदवारी अर्जही भरु दिला नसता”

-“मोदी साहेब… पवारांचं सोडा, तेवढं जशोदाबेनचं काय झालं सांगा”