हैदराबाद | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, खुशाल गोळी मारा, असं ते म्हणाले आहेत. ते एका सभेत बोलत होते.
मी या देशाचा नागरिक आहे असल्याचं सिद्ध करण्यासाठी ते मला कागदपत्रं मागतील. पण मी कागदपत्र देणार नाही. ते कागदपत्रं मागणार असतील तर मी त्यांना माझी छाती दाखवेन आणि गोळी मारा असं सांगेन, असं ओवैसी म्हणाले आहेत.
ओवैसी यांनी नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या मुद्द्याविरोधात भूमिका घेतली आहे. सरकारचे कायदे मुस्लीम समाजावर अन्याय करणारे आहेत, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सीएए आणि एनआरसीवरुन देशात अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. या कायद्यांचा विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
आज ती जळाली नाही, समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला- चित्रा वाघ
पीडितेच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी दिली जाईल- अनिल देशमुख
महत्वाच्या बातम्या-
या सदस्याच्या निधनानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा
ती आपल्यातून निघून गेली, पण नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी- देवेंद्र फडणवीस
पीडितेच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरी दिली जाईल- अनिल देशमुख
Comments are closed.