बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहीन बागमध्ये ‘जालियनवाला बाग’ होऊ शकतो; ओवैसींना संशय

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर 8 फेब्रुवारीनंतर शाहीन बागचा जालियनवाला बाग होऊ शकतो, असा संशय एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) गेल्या 50 दिवसांपासून शाहीन बागमध्ये महिलांचे धरणे आंदोलन सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शाहीन भाग प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलं. यावरुन ओवैसी यांनी हा संशय व्यक्त केला आहे. ते एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

दिल्ली विधानसभेची निवडणूक पार पडताच शाहीन बाग येथील आंदोलकांना हटवण्यात येण्याची शक्यता आहे. यावर बोलताना ओवैसी म्हणाले की, कदाचित इथल्या आंदोलकांवर सरकार गोळीबार करेल. हे घडू शकतं, कारण भाजप मंत्र्यांने गोळ्या घाला असं म्हटलंच आहे.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्यावरुन देशात अंशातता आणि अस्थिरतेचं वातावरण आहे. या मुद्द्यांविरोधात अनेत लोक निदर्शनं करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील आता शिवसेनेच्या वाटेवर?

हेलिकॉप्टर घ्यायचंय तेही कष्टाच्या पैशातून- रोहित पवार

महत्वाच्या बातम्या- 

“बच्चू कडू…तुमच्यासारखा वाघ शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”

हिंदूंसाठी धर्म आस्थेचा विषय, तर संघासाठी धर्म म्हणजे धंदा- कन्हैया कुमार

“थोडीशी माणुसकी असेल तर अण्णा हजारेंनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More