Top News

“शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतकी का घाबरते?”

ठाणे | शिवसेनेचं युतीबाबत काय चालू आहे, हे समजतच नाही. ते नरेंद्र मोदींना इतके का घाबरतात? असा सवाल एमआयएम अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी यांनी केला आहे. ते कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलत होते.

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी यावेळी भाष्य केलं. तसेच महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचा पाडाव करणारच, असा इरादा त्यांनी व्यक्त केला.

ओवैसी यांनी भाजप बरोबरच काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. गेली 70 वर्ष काँग्रेसने तर आताचे 4 वर्ष भाजपने विकासाच्या नावावर वाया घालवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका, नाहीतर फसाल. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना साथ देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी लोकांना केलं.

महत्वाच्या बातम्या-

-अबब…सुपरमॅनलाही लाजवेल असा हार्दिक पांड्याचा झेल, विराटही झाला अवाक

-बाबासाहेबांना ‘भारतरत्न’ नाईलाजाने देण्यात आला- असदुद्दिन ओवैसी

-भाजप सेनेची अशीही युती, हे दोघ नेते होणार व्याही-व्याही

-अमितच्या लग्नातही राज ठाकरेंनी लकी क्रमांकाचं गणित जूळवलच!

-आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे युतीबाबतचं मत अजमावणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या