…म्हणून असदुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये 4 दिवस ठाण मांडणार

औरंगाबाद |  एमआयएमचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार इम्तीयाज जलील यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी औरंगाबादमध्ये 4 दिवस तळ ठोकणार आहेत.

असदुद्दीन ओवैसी या चार दिवसांच्या कार्यकाळात कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन भेटी, रॅली आणि प्रचारसभाही घेणार आहेत. एमआयएमने औरंगाबादच्या जागेसाठी चांगलीच कंबर कसलेली आहे.

नांदेडमध्ये सभा घेतल्यानंतर असदुद्दीन ओवैसी औरंगाबादला दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. 16 ते 19 एप्रिल या काळात ओवैसींकडून प्रचार केला जाईल.

दरम्यान, औरंगाबाद लोकसभेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, काँग्रेसकडून सुभाष झांबड तर एमआयएमकडून इम्तीयाज जलील हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

-गिरीश महाजन संतापले; राज ठाकरेंना दिलं हे आव्हान

“राज ठाकरेंनी मोदी, शहांना घालवण्याची ‘सुपारी’ नाही तर ‘विडा’ घेतलाय”

-सुजयच्या प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; साकळाई योजना पूर्ण करणारच!

-जालन्यात रावसाहेब दानवेंचा कस लागणार; औताडे मुसंडी मारण्याची शक्यता

-भाजपलाच मतदान करा, मोदींनी कॅमेरे लावले आहेत; भाजप आमदाराची धमकी