Top News

अयोध्या निकालावर मी समाधानी नाहीये- असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली |  राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर मी समाधानी नाहीये, असं एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.

न्यायालयाने मशीदीसाठी दिलेल्या 5 एकर जमीनीवर ओवैसींनी जोरदार टीका केली आहे. आम्हाला कुणाच्या भीकेची गरज नाही. मी जर हैदराबादमध्ये जाऊन भीक मागितली तरी मी 5 एकर जमीन खरेदी करू शकतो आणि मशीदही बांधू शकतो, असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

न्यायालयाचा निर्णय हिंदू राष्ट्राच्या दिशेने जाणार आहे, असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. सुप्रिम कोर्ट सर्वोच्च जरूर आहे. पण आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही मान्य नसलेला निर्णय मानणार नाही, असंही ओवैसी म्हणाले आहेत.

दरम्यान, 5 एकर जमीनीची खैरात मुस्लिमांना नको. मुस्लिम पक्षकारांनी ती 5 एकर जमीन नाकारावी, असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या