देश महाराष्ट्र मुंबई

प्रामाणिक पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अस्वस्थ झाले- आशा भोसले

Loading...

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रामाणिक पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याचं ऐकून मी अस्वस्थ झाले आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

आशा भोसले यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासोबतचा एक फोटो जोडला आहे. गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध देखील केला आहे.

प्रामाणिक पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर विरोधकांनी हल्ला केला. अशा प्रकारे झालेला कुठलाही शारीरिक हिंसाचार योग्य नाही. सत्यमेव जयते, असं आशा भोसले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी पालघर प्रकरणावर बोलताना लाईव्ह शोमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर हल्ला केला, असा आरोप त्यांनी केला आहे.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

वांद्रेची घटना सरकारला अडचणीत आणण्यासाठी घडवली गेली- संजय राऊत

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या