बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गायिका आशा भोसलेंचा मुलगा दवाखान्यात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | बाॅलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांना दुबईतील दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले हे अचानकपणे जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाल्याची माहिती सध्या प्राप्त होत आहे.

आनंद यांना शरीरावर काही जागी जखमा झाल्या आहेत. सध्या आनंद यांची तब्येत ठिक असून त्यांना जनरल वाॅर्डमध्ये हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आनंद यांच्या दवाखान्यात दाखल होण्याची माहिती मिळाल्यावर लगेच आशा भोसले यांनी दुबईतच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगेशकर आणि भोसले कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंद यांच्या तब्येतीची विचारपूस करताना पाहायला मिळत आहे. या प्रसंगात सर्व कुटुंब एकवटलं आहे. आशा भोसले आणि त्यांचं कुटुंब सध्या दुबईच्या दौऱ्यावर आहे त्यावेळी हा सर्व प्रकार घडला.

दरम्यान, आशा भोसले यांच्या बहिण गाणकोकिळा लता मंगेशकरांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. त्यानंतर आता आनंद भोसले यांना दवाखान्यात दाखल करावं लागलं आहे. अशावेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांची काळजी घेताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“…म्हणून भाजप ठाकरे सरकारवर दबाव आणतंय”, पवारांनी सांगितलं कारण

“मनसे आता उद्धव ठाकरेंचे वडीलही हायजॅक करणार का?”

“पाकिस्तानात दाऊद इब्राहिम बसलाय आणि तो महाराष्ट्रातील…”, राऊतांचा जोरदार पलटवार

… अन् ‘या’ कारणामुळे रणबीर-आलियाने लग्नात सात नाही तर चारच फेरे घेतले

“गृहमंत्रीपदाचा हिसका दाखवा, 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More