नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. याच आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात लढताना मला केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा आशीर्वाद आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.
नितीन गडकरी मला पितृतुल्य असून त्यांचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे, असं आशिष देशमुख म्हणाले आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
नागपूर दक्षिणमधून मुख्यमंत्र्यांचं पारडं जरासं जड मानलं जात आहे. मात्र आशिष देशमुख हे कधी काळी भाजपमध्येच होते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि भाजपचे डावपेच देशमुख चांगलेच ओळखून असल्याची चर्चाही नागपूरमध्ये आहे.
दरम्यान, नितीन गडकरी यांच्याजवळच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची तिकीट कापली असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांत सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशमुख यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जातंय.
महत्वाच्या बातम्या-
“माझ्यातली पंकजा मुंडे केव्हाच संपलीये… मी आता गोपीनाथ मुंडे धारण केलाय” – https://t.co/H90p6yVNQ8 @Pankajamunde @dhananjay_munde @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेले माजी खासदार म्हणतात; मी कायम पवारांसोबतच! https://t.co/HtRYFQHapa @NCPspeaks @Shivsena
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
काॅंग्रेसच्या पायात राष्ट्रवादीचा पाय; प्रणिती शिंदेंविरोधात दिला उमेदवार https://t.co/ioEBlBlOxf #विधानसभा
— थोडक्यात (@thodkyaat) October 5, 2019
Comments are closed.