नागपूर महाराष्ट्र

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा- आशिष देशमुख

नागपूर | वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने जनतेसोबत राहावं. ठाकरे सरकारवर दबाव आणून या सरकारला शॉक द्यावा, असं म्हणत आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घऱचा आहेर दिलाय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

राज्यातील पाच कोटी ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेसोबत राहावं. हे सरकार काँग्रेस आमदारांच्या भरवशावर आहे, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचं घूमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेसने महाविकास आघाडीला शॉक दिलाच पाहिजे, असं आशिष देशमुख म्हणाले.

फडणवीस सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशामध्ये राजीनामे ठेवले होते. काँग्रेसनेही तेच करावं. जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खिशात राजीनामे ठेवावेत, असं आशिष देशमुख यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही त्यांना चितपट करु- जयंत पाटील

“जनतेच्या मनात उत्सुकता आहे की ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय आहे?”

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक डिजीटलपद्धतीने होणार!

“पवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी”

“शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या