बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंनी यांना सरकारमध्ये घेतलं तेव्हा मेलेले जिवंत झाले”

नागपूर | राज्यात शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यापासुन महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं आहे. तीन पक्षांच सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा समावेश आहे. परंतु, या तीन पक्षांमध्ये अनेकवेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काँग्रेसवाले मेले होते का?, शिवसेना आणि भाजपचं सरकार होत त्यावेळेस यांना कोणीच विचारल नाही, असं वक्तव्य आशिष जयस्वाल यांनी केलं आहे. आशिष जयस्वाल यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा वाद होण्याची चिन्हे आहेत.

नागपुर येथे जिल्हा परिषदेची पोटनिवडणुक होत आहे. यावेळी सभेत बोलताना आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांना सरकारमध्ये घेतले. त्यामुळे मेलेले जिवंत झाले आहेत. त्यांनी बोलताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

दरम्यान,  दोन्ही काँग्रेसला गळती लागली होती. यांच्याकडील लोक दुसऱ्या पक्षात उड्यामारून जात होते. यावेळी अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी माझे वरपर्यंत संबंध आहेत. हे लोक भुरटे आहेत, त्यांना काय करायचे ते करू द्या, असं म्हटलं आहे. तसेच मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कशाप्रकारे अन्याय करत आहेत हे सांगितल आहे, असंही आशिष जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

MPSC चा निकाल जाहीर! प्रसाद चौगुले राज्यात प्रथम, तर मुलींमध्ये मानसी पाटील

अनिल परबांनंतर शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या अडचणी वाढल्या

अखेर कन्हैय्या कुमारांची राहुल गांधींना साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश!

2021 वर्षाचा बेस्ट ड्रामा अवॉर्ड महापौर मॅडमना द्यायला पाहिजे- निलेश राणे 

जर काँग्रेस वाचली नाही तर….’; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हैया कुमार गरजला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More