बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपीला झाली डेंग्युची लागण

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी येथे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने निर्दयीपणे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली होती.यात काही शेतकऱ्यांचा मृत्यु झाला होता. यावरून आरोपी आशिष मिश्रा याला अटक करण्यात आली होती. आता तुुरूंगात असलेला मुख्य आरोपी आशिष मिश्रा याला डेंग्युची लागण झाली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. आरोपी आशिष मिश्रा याला डेंग्युची लागण झाली असून मिश्रा याला उपचारासाठी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा अटकेत आहे. शनिवारी संध्याकाळी कारागृहाच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक अरूण कुमार सिंग यांनी दिली आहे.

हिंसाचाराच्या आरोपासंदर्भात आशिष मिश्रा याला न्यायालयाने चौकशीसाठी पुढील दोन दिवसांकरिता पोलीस कोठडी सुनावली आहे. केंद्र सरकारकडून जाणीवपुर्वक आशिष मिश्राला अटक करण्यात येत नाही, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता.

दरम्यान, या शेतकरी हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील आरोपी मोहित त्रिवेदी, रिंकू राणा आणि धर्मेंद्र यांना शनिवारी अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. आरोपींची चौकशी करण्याकरिता  14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मराठी साहित्य संमेलनावरून नियोजक आणि अध्यक्षांमध्ये पत्रापत्री वाद रंगला

भारताला जबरदस्त धक्का! भारताची सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतली

‘गांजाच्या नशेत जर कुणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर…’; संजय राऊतांची तुफान टोलेबाजी

“राज्य सरकार हॉटेल, लॉन्सला परवानगी देते म्हणजे तिथे काहीही धंदे करा असं सांगत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More