बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी दिली नाही तर…’; आशिष शेलारांचा सरकारला इशारा

सोलापूर | महाराष्ट्रासह पुर्ण देशभरात अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव साजरे केले जातात. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासुन सर्व सण आणि उत्सवांवर सरकारने निर्बँध लावले आहेत. अशातच आता विरोधी पक्ष भाजपने येत्या दहीहंडीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करू इशाराही भाजपने दिला आहे.

ज्या गोविंदांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्या गोविंदांना दहीहंडी साठी परवानगी द्यावी. जेणेकरून ते आपल्या विभागात पारंपारिक दहीहंडी उत्सव साजरा करू शकतील. दहीहंडी कार्यक्रमात कमी गर्दी करून ही मंडळे कार्यक्रम करतील. जर राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी दिली नाही तर आंदोलन करू, असा इशाराही शेलारांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य शासनाने गणेश मंडळांवर जे निर्बंध लादले आहेत, त्यांच पालन मंडळांकडून होत आहे. तसेच त्यांच्याकडुन शिस्तही पाळली जात आहे. या मंडळाकडुन कोरोनाबाबत अनेक आरोग्याबाबतचे उपक्रम देखील राबवले जातात. त्या धर्तीवर शासनाने दहीहंडीला परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

दरम्यान, सर्व सण आणि उत्सवांवर बंदी असू नये, उत्सवांची परंपरा कायम राहील अशी भुमिका शासनाने घ्यावी असं शेलारांनी म्हटलं आहे. यासंदर्भात बैठक आयोजित केली होती. मात्र सोलापुर दौऱ्यावर असल्याने शेलार यांना बैठकीला हजर राहता आलं नाही.

थोडक्यात बातम्या- 

‘तालिबानी भारतासाठीही ठरू शकतात धोकादायक???’; शिया धर्मगुरू मौलानांचा भारताला गंभीर इशारा

नीती आयोगाच्या ‘त्या’ गंभीर इशाऱ्यावर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

‘तहसीलदार मॅडम ‘तो’ विचार डोक्यातून काढून टाका’; अण्णा हजारेंचा तहसीलदारांना मोलाचा सल्ला

महेश मांजरेकर कॅन्सरग्रस्त! प्रकृतीबाबत आली ‘ही’ मोठी माहिती समोर

तुमच्याजवळ फाटलेल्या नोटा आहेत?, वाचा कशा बदलाल या फाटलेल्या नोटा?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More