Top News

“थाळ्या नाही वाजवायच्या तर घरात बसून अंडी उबवायची?”

मुंबई | हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल व टाळ्या व थाळ्या वाजवून होणार नसेल, जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत, तर काय घरात बसून अंडी उबवायची? स्वतः घरात बसून मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नाही, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.

सरकार पाडून दाखवा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वारंवार म्हटलं जातं. यातून त्यांच्या मनात असलेली एक असुरक्षितता व भीती यातून दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला केव्हाच आव्हान दिलं आहे की, अगोदर सरकार चालवून तरी दाखवा. आमचं तर म्हणनं आहे की कधीतरी घराबाहेर पडून तरी दाखवा, असं शेलार म्हणालेत.

महाराष्ट्र जेव्हा एका अर्थाने महापुरामध्ये, करोनामध्ये, चक्रीवादळामध्ये ज्यावेळा त्रस्त होता. त्यावेळी तुम्ही काय करत होता? हा महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतो आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘कुणीही कितीही टरटर केली तरी…’; नवाब मलिकांचा भाजपला टोला

“ना जीडीपी कळतो, ना अर्थव्यवस्था, महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बुद्धू मुख्यमंत्री बसलाय”

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर, जाणून घ्या!

संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?- नारायण राणे

बाळासाहेब ठाकरेंकडे पाहून गप्प बसलोय, आमच्याकडे नजर फिरवू नका नाहीतर…- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या