Top News

‘आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या’; शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

मुंबई | केंद्र सरकारनं कांजूरमार्गची जागा आमची असल्याचं सांगत मेट्रोचं काम थांबवण्याचं पत्र पाठवल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलं आहे.

बाफना नावाच्या व्यक्तीने न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. जानेवारी 1997 मध्ये त्यावर स्थगिती आदेश दिला आहे, असा अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. यानंतर आपण महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार आपण एवढी मोठी जमीन हस्तांतरित करण्याचा निर्णय का घेतला?, असा सवाल आशिष शेलारांनी विचारला आहे.

कांजूरमार्गच्या जागेबद्दल अनेक न्यायालयात केसेस प्रलंबित आहेत या गोष्टी आपण जनतेला का सांगितल नाही. केंद्र सरकारने 22 सप्टेंबरला या जागेबाबत न्यायालयात दावा दाखल केला होता, हे का लपवण्यात आलं, असंही शेलार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यघटनेनुसार कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही- पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; अर्णब गोस्वामींबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिले ‘हे’ आदेश

“फडणवीस सरकारने मुंबईकरांचा विश्वासघात केला, कागदोपत्री सिद्ध करुन दाखवणार”

दम असेल तर… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना ओपन चॅलेंज!

मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर कायमची बंदी आणावी; सत्यजीत तांबेंची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या