“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले म्हणून हिरव्या उचक्या लागल्या”
मुंबई | मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण तापलेलं असताना राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मनसे (MNS) आक्रमक झाल्याने राज्यात सेना-मनसेत जुंपलेली पाहायला मिळत आहे.
शक्तीपीठ, तीर्थस्थान, प्रार्थनालय हे वेगवेगळे आहेत. तीर्थस्थानी लाउडस्पीकरची आवश्यकता असते. मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढावे लागले म्हणून शक्तीपीठ तीर्थस्थळावर कारवाई केली, असा आरोप भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.
जे स्वत:चं राजकीय अस्तित्व परपक्षाच्या खांद्यावर बसून करतात त्यांनी दुसऱ्यावर बोलू नये. शिवसेनेचे विश्वविख्यात प्रवक्ते आणि काँग्रेस प्रवक्त्याच्या हिरव्या उचक्या वाढायला लागल्या आहेत, असा घणाघात देखील आशिष शेलारांनी केला आहे.
दरम्यान, भ्रष्टाचाराचं कुरण कसं वाढतंय. जमिनीचे भाव प्रचंड असताना कवडीमोल किमतीला सरकारी जागा देण्याचं काम ठाकरे सरकार करतंय. पोलखोलच्या माध्यमातून आम्ही ठाकरे सरकारची अनेक प्रकरणं समोर आणत आहोत, असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“ज्यांच्यात क्षमता आहे असं वाटायचं त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचे राजकारण सुरू केलं”
“…तर MIM देखील गप्प बसणार नाही, बघू आम्हाला कोण थांबवतं”
पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, 10वी उत्तीर्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच
यंदाही चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा जारी
‘…तर पुतिन यांची हत्या होऊ शकते’, धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.